हिट अँड रनच्या कायद्यात होणार बदल ? काय आहे नवीन कायदा

0

नवी दिल्ली ;– गेल्या काही दिवसांपुर्वी राज्यासह देशात ट्रॅंकर चालकांच्या संपामुळे खळबळ उडाली होती. संपुर्ण राज्यभरात करण्यात आलेल्या संपामुळे अचानक इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होत इंधन भरून घेण्यासाठी नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याचं दिसून आलं. केंद्र सरकारच्या गृह खात्याच्या मध्यस्थीनंतर केंद्र सरकारच्या pp हिट अँड रनचा नवीन कायद्यात बदल केला जावा अशी मागणी ट्रॅंकर चालकांकडून करण्यात येत होती.

आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येच असून, केंद्र सरकारच्या ‘हिट अँड रन’च्या (Hit and Run) नवीन कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी विरोध केला असताना या पार्श्वभुमीवर अशावेळी अपघाताची जबाबदारी मालकावर टाकण्याचा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागाने तयार केलेला आहे. आता या पद्धतीचा कायदा आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

या नविन कायद्यानुसार, खासगी लक्झरी बसला अपघात झाला असल्यास मालकही दोषी ठरणार असून भीषण अपाघात झाल्यास त्याची जबाबदारी बस चालकासोबतच मालकावरही टाकणार असा प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. मात्र सध्या या प्रस्तावावरुन वाद निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या नवीन बस वाहन कायद्यात मालकावर जबाबदारी टाकल्यानंतर बस सुस्थितीत राहणार असून देशातील अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकतात, अशी शक्यता परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी वर्तवलेली आहे.

राज्यासह पूर्ण देशभरात आतापर्यंत बसच्या अपघाताला केवळ गाडीच्या चालकालाच दोषी ठरवले जात होते मात्र अनेकदा गाडीतील बिघाड, ओव्हरलोडेड गाडी चालकाला चालवण्यास मालक वर्ग हे भाग पाडत असतात. त्यामुळे अपघात झाला तर केवळ गाडी चालकालाच दोषी न ठरवता मालकाला देखील दोषी ठरवले जाणार असल्याचा नविन कायदा येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागाने तयार करून मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवलेला आहे. या कायद्यात आता काय काय बदल केले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.