फैजपूर येथे कृषी प्रदर्शनाला जनार्दन हरी महाराज यांची भेट….!

0

मोरगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मोरगांव (ता.रावेर) याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या तीन दिवसांपासून फैजपूर (ता.यावल) येथे कृषी विज्ञान केंद्र पाल व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. या ठिकाणी विविध कंपन्यांचे स्टॉल तसेच शेती विषयांमध्ये झालेला आधुनिक बदल व नवीन संसाधने तसेच बियाणे रासायनिक खते रोपवाटिका व बरेच काही शेतीमध्ये झालेले बदल या प्रदर्शनात त मांडण्यात आलेले आहेत. तसेच बऱ्याच कंपन्यांनी या प्रदर्शनामध्ये आपले स्टॉल लावलेले आहेत. या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी सतपंथ मंदिर फैजपुर चे गादीपती जनार्दन हरी महाराज यांनी आपल्या शिष्यांसह सदर प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी कृषी विज्ञान केंद्र पाल चे प्रमुख महेश महाजन, सचिव अजित पाटील तसेच बोरोले सर व असंख्य सेवेकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.