हिंगोणा येथे माथेफिरूंनी केळीचे खोड कापून फेकले, पिकांचे नुकसान थांबेना

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील हिंगोणा येथे अज्ञात माथेफिरूने शेतातील केळीचे खोड कापून फेकल्याने शेतकऱ्यांचे केळी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की हिंगोणा तालुका यावल येथील शेतकरी भरत सुरेश नेहेते यांनी प्रमीला महाजन गट नं ९६५ यांची शेती खंडाने कसण्यास केली आहे. ही शेती हिंगोणा गावापासुन १ की.मी अंतरावर आहे. ते दिनांक १६ रोजी सकाळी शेतात गेले असता, त्यांच्या शेतातील शंभर ते दीडशे केळी खोड अज्ञात माथेफिरूने कापून फेकल्याचे त्यांच्या निर्देशनास आले. तसेच याच रस्त्याने पुढे बोरखेडा गावा लगत गजेंद्र राजपुत यांचे गट नं ८७६ असुन त्यांच्या शेतातील देखील अशाच प्रकारे शंभर ते दिडशे केळी खोड कापुन फेकण्यात आले आहे.

या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हिंगोणा परिसरातील शेती शिवारामध्ये अशा घटना वेळोवेळी घडत आहे. शेतकऱ्यांच्या विहिरींच्या मोटार पंपाची केबल वायर चोरी करणे, स्टार्टर चोरी करणे, शेती पिकाच नुकसान करणे, पाईपलाईन तसेच ठिबक चोरी करणे अशा घटना वेळोवेळी घडत आहेत आणी अशा तक्रारी फैजपुर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आल्या आहे. परंतु याबाबत अद्याप पर्यंत कुठलाही अज्ञात चोर पोलिसांच्या हाती लागला नाहीये. तरी माथेफिरुंचा शोध घेतला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.