पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळ्यात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून नगरपालिकेने त्वरित दखल घेऊन, या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा शहरात सध्या मोकाट कुत्र्यांच्या प्रमाणात अती वाढ झालेली असल्याने हे मोकाट कुत्रे अनेक नागरिकांचा चावा घेत असून याप्रकारात वाढ झाली आहे. मोकाट कुत्रे हे झुंडीने फिरून लहान मुलांवर व नागरिकांवर अचानक हल्ला चढवत आहेत. याप्रकरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या मोकाट कुत्र्यांनमुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पारोळा नगरपालिकेच्या वतीने या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त व्हायला हवा अशी मागणी जोर धरू लागली आहे.