हिंदु राष्ट्र स्थापनेपर्यंत अविरत कृतीशील राहणार !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

नुकतीच जळगाव येथे पार पडलेल्या भव्य हिंदु राष्ट्र जागृती सभेनंतर धर्मकार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील गायत्री माता मंदिरात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला उपस्थित धर्मप्रेमी बांधवांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करेपर्यंत अविरत कार्य करणार असल्याचा निर्धार उत्स्फूर्तपणे बोलून दाखवला. या बैठकीला समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले. या वेळी शहरातील ६ भागांमध्ये धर्मजागृतीचे कार्य करण्याच्या दृष्टीने साप्ताहिक धर्मशिक्षण वर्गांची आणि ६ भागांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाची मागणी करण्यात आली.

७ जानेवारीला ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चाचे आयोजन

हिंदु राष्ट्र जागृती सभेत जळगाव मधील हिंदुंवर होणार्‍या विविध आघातांच्या संदर्भात वक्त्यांनी परखड विचार मांडले. त्यात जिल्ह्यात होणारी गोतस्करी, अवैध कत्तलखाने, गोहत्या यांसोबतच चोपडा, यावल, भुसावळ आदी तालुक्यात चालू असलेले धर्मांतरण याविरोधात ७ जानेवारीला ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ काढण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.