खामगावात आरोग्य विभाग ‘ वाऱ्यावर’

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
खामगाव – शहर व तालुक्यात आरोग्य विभागाचा मनमानी कारभार होत आहे. यामध्ये खाजगी डॉक्टरांकडून रूग्ण व नातेवाईकांची पिळवणूक व मानहानीचे प्रकार असो वा अन्य याकडे आरोग्य विभागाचे अधिकारी लक्ष देण्यास तयार नाही. मुन्नाभाई डॉक्टरांच्या बाबतीत तर बोलायलाच नको, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिलाष खंडारे मस्तवाल बनून इतर डॉक्टरांच्या गळ्यात घंटा बांधू पाहण्याचा प्रकार करीत आहेत.
आज 19 जानेवारी 2023 रोजी येथील नागरी आरोग्य केंद्र नगर परिषद दवाखान्याचा भोंगळ कारभार सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून च्व्हाट्यावर आला आहे. या दवाखान्यातील बाह्य रुग्ण विभाग उघडण्याची वेळ सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत असताना दवाखाना बंद होता तर 9 वाजे नंतरही एकही डॉक्टर किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. विशेष बाब म्हणजे या ठिकाणी ज्या महिला डॉक्टरला नियुक्त करण्यात आले आहे त्या कधीही उपस्थित राहत नाहीत, कारण त्यांचेवर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची विशेष मेहरबानी असल्याचे आरोग्य कर्मचारी बोलत आहेत. याबाबत काय खरे, काय खोटे तेच जाणो, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खामगावात आरोग्य विभागात चाललेला मनमानी कारभार थांबवावा, अशी रास्त मागणी सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.