पाल येथे श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव – धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर “युवकांचा ध्यास ग्राम -शहर विकास” आणि एम. एस. डब्ल्यू. प्रथम आणि बी.एस.डब्ल्यू. प्रथम वर्षाचे ग्रामीण शिबिराचे आयोजन सातपुडा विकास मंडळ पाल येथे संस्थेत दिनांक १८ जानेवारी ते २४ जानेवारी या कालावधीत आयोजन केले आहे.
उद्घाटन कार्यक्रमास पाल गावातील पहिल्या महिला शिक्षिका, माजी तथा जि. प. सदस्य गोमतीताई बारेला, कार्यक्रमाचे अध्यक्ष धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीचे सचिव प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी , संचालक डॉ. विनय पाटील, प्रमुख अतिथी संचालक रासोयो कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉ. सचिन नांद्रे , विशेष उपस्थिती सातपुडा विकास मंडळ पाल चे सचिव अजित पाटील, सरपंच हाजिराताई तडवी , उपसरपंच ललिताताई पवार, जेष्ठ प्राध्यापक डॉ. उमेश वाणी , रासोयो विभागीय समन्वयक डॉ. नितीन बडगुजर, कृषी विज्ञान केंद्र पाल चे प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ महेश महाजन , शिबिर समन्वयक डॉ. कल्पना भारंबे , राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निलेश शांताराम चौधरी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अशोक हनवते , डॉ. सुनिता चौधरी, डॉ. योगेश महाजन, डॉ. जुगल घुगे , हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन हे तुळशी वृंदावनला पाणी वाढवून झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. निलेश चौधरी यांनी ७ दिवशीय शिबिराचे सप्तरंग उलगडून सांगताना या शिबिरात विद्यार्थी हे स्वच्छ भारत अभियान , ग्रामीण विकास , आपत्ती व्यवस्थापन , माझी वसुंधरा अभियान , निसर्ग संपत्तीचे संरक्षण , आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतील. तसेच दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी बौद्धिक सत्रात १) आजची महिला शक्ति – सरपंच गोमतीताई बारेला २) सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर डॉ. प्रमोद सरोदे हे मार्गदर्शन करणार आहेत. १९ जानेवारी २०२३ रोजी १) आजचा युवक आणि भावनिक बुद्धिमत्ता – डॉ. शंकर जाधव २) शेती आणि महिला – स्नेहलता गांगजी हे मार्गदर्शन करणार आहेत. २० जानेवारी २०२३ १) भारतीय मुल्ये आणि आजचा युवक – प्राचार्य लता मोरे २) स्वच्छ भारत अभियान आणि आजचा युवक – प्रा. मुकेश चौधरी हे मार्गदर्शन करणार आहेत. २१ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर राज्यस्तरीय आव्हान शिबिरातील प्रशिक्षित रा.सो.यो. स्वयंसेवक एकदिवसीय प्रशिक्षण देणार आहेत. २२ जानेवारी २०२३ रोजी १) बहिणाबाई आणि महिला सबलीकरण – डॉ. राजश्री नेमाडे २) ग्रामविकास आणि युवक – कुमार रामभाऊ चौधरी उपाध्यक्ष जनता शिक्षण मंडळ खिरोदा हे मार्गदर्शन करणार आहेत. २३ जानेवारी २०२३ रोजी १) व्यसनमुक्ती जनजागृती पर पथनाट्य , २) बालविवाह प्रतिबंधक कायदा पथनाट्य सादरीकरण ३) ग्रामस्वच्छता या उपक्रमाचे आयोजन पाल गावात केलेले आहेत.
२४ जानेवारी २०२३ रोजी पाल गावात सकाळी ग्रामस्थांच्या साहाय्याने (PRA) ग्रामीण लोकसहभागीय मूल्यावलोकन हे प्रा. डॉ. योगेश महाजन ,प्रा. डॉ. निलेश शांताराम चौधरी डॉ. जुगल घुगे करणार आहेत.
या शिबिरात स्वयंसेवकांची दिनचर्या सकाळी : ५ वाजता जागर , ५:३० ते ६:१५ प्रार्थना , ध्यानधारणा , योगा , ६:३० ते ६:५५ चहापान , अल्पोपार , ७:०० ते १०:०० श्रमदान , १०:०५ ते ११:२५ स्वयं स्वच्छता ११:३० ते २:०० भोजन विश्रांती दुपारी :- २:१५ ते ३:०० गीतमंच
बौद्धिक सत्र : ३:०० ते ३:४५ व्याख्यान सत्र १/३/५/७/९ ३:४५ ते ४:३० व्याख्यान सत्र २/४/६/८/१०
संध्याकाळी: ४:४५ ते ५:१५ चहापान ५:२० ते ७ :०० गटचर्चा , ७:१५ ते ८:०० भोजन रात्री: ८:१५ ते ९:३० सामाजिक विचारमंथन , ९:४५ ते ९:५० प्रार्थना, ९:५५ दिपमालवण या शिस्तबद्ध दिनचर्येत शिबिरातील स्वयंसेवक हे स्वावलंबन ,सहजीवन , समायोजन , शिस्त याचे स्वंयधडे घेतील.
कार्यक्रमाच्या उद्घाटक गोमतीताई सिताराम बारेला यांनी बेटी बचाव बेटी पढाव या विषयावरती मार्गदर्शन केले. मुलीने शिक्षणाच्या प्रवाहात यायला पाहिजे. जेणेकरून ती तिच्या दोन्हीही कुटुंबाच्या लोकांना शिक्षित करू शकेल. त्यानंतर पाल गावाच्या सरपंच हजिराताई यांनी महिलांनी त्यांच्या स्वतःच्या हक्कांसाठी साठी लढले पाहिजे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. उमेश वाणी यांनी स्वयंसेविकांना उद्बोधक असतानां युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या शिबिराच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने युवकांना ग्रामीण जनजीवन समजायला मदत होईल. डॉ. विनय पाटील यांनी वाचनालया विषयी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन तुळशी वृंदावनाला पाणी वाढवून केल्याने तुळशीच्या भोवती प्रदक्षिणा घालून ऑक्सिजन कसा मिळतो हा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला.
मा. अजित पाटील यांनी थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब धनाजी नाना चौधरी आणि स्वर्गीय लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या संकल्पनेतून पाल हा परिसरात पावरा आदिवासी समाजातील मुलांसाठी शिक्षणाची गंगोत्री या ठिकाणी निर्माण केली. आणि समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी संशोधनातून या परिसरातील ग्राम समुदायाचा अभ्यास करुन स्वतःसाठी संधी निर्माण कराव्यात.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी आजच्या युवाशक्तीने ग्राम शहर विकासाचा ध्यास जर्मनी बाळगला तर नक्कीच येणाऱ्या काही वर्षातच आपण समृद्ध भारत या व्याख्येची एकरूप होऊ म्हणून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या शिबिरामधून ग्राम शहर विकासाचे धडे घ्यावेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिता चौधरी यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ. कल्पना भारंबे यांनी केले राष्ट्रगीत घेऊन शिबिराचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.