क्रिकेटवरुन दोन गटात ‘राडा’

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
मलकापूर – शहरातील रामदेव बाबा नगर परिसरात क्रिकेट सामन्यानंतर दोन गटात राडा झाला. या वादातून दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक झाली. दोन्ही बाजूचा जमाव आक्रमक झाला होता. त्यातून तुफान हाणामारी देखील झाली. पोलिस विभागाने घटनेतील 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मलकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी घटनेसंदर्भात दिलेली माहिती अशी की, रामदेव बाबा नगर परिसरात क्रिकेट सामन्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला होता. या वादाचे पर्यावसण हाणामारीपर्यंत पोहचले होते. तर यावेळी दोन्ही कडून तुफान दगडफेक सुरू झाली असल्याचे समजते. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाले. तेव्हा दोन्ही गटाकडील लोक घटनास्थळावरून पळून गेले.
याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील २० जणांवर दंगा केल्या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला कलम १६० नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.