वरणगावला दहशद ; बंद घरात चोरी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
वरणगाव – शहरातील हिना पार्क मधील बंद घरात अज्ञात चोरट्यानी प्रवेश करीत अलमारी तोडून सोन्याच्या दागीन्यासह रोकडवर हात साफ केल्याची घटना दि १९ रोजीच्या दुपारी उघडकीस आली
याबाबत माहिती असे की मुक्ताईनगर रोडवरील हिनापार्क मधील डॉ ईलीयास अहमद खान हे दि १४ जानेवारी पासुन मुंबई येथे गेले होते ते दि १९ रोजी च्या दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरी परत आल्या नतंर घरात प्रवेश करण्याच्या आधीच घराचे प्रवेशद्वार व सी सी कॅमेरा तोडून त्यावर कपडा गुडाळलेल्या स्थीतीत दिसून आल्याने लगेच याबाबत पोलीसात खबर दिल्याने सह्य पोलीस निरिक्षक आशिष अडसुळ , उपोनि परशुराम दळवी यांनी घटना स्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करीत असताना अज्ञात चोरट्यानी घराचा मुख्य लोखंडी दरवाजाचे कडी कोडा तोडून घरात प्रवेश करीत घरातील सी सी कॅमेऱ्यावर कापड गुंडाळून ठेवले व घरातील लाकडी अलमारीत कपडे अस्था व्यस्था करीत लोखंडी कपाटातील लॉकर तोडून सोन्याचे दागिने त्यात गळ्यातील नेकलेस , कानातील झुमके असे तीन तोळे अंदाजे किमत पचावन्न हजार रुपये व पंधरा हजार रुपये रोख असा एकून बहत्तार हजार रुपये किंमतीच्या ऐवजावर हात साफ करीत जाताना सी सी कॅमेऱ्याचे डी व्ही आर माशिनची चोरी करून घेऊन गेले।
या बाबत डॉ इलीयास खान यांच्या खबरी वरून अज्ञात चोरा विरोधा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सह पो निरिक्षक आशिष अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपोनि इस्माईल शेख हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.