हिवाळ्यात लसुण खाण्याचे आरोग्यदायक फायदे !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

वनौषधी गुनौषधी : हिवाळ्यात लसुण (garlic) खाण्याचे अनेक फायदे आहेत. लसणाचे सेवन केल्याने शरीराला होणाऱ्या अनेक प्रकरच्या आजरांपासून वाचवतो. लसूणमध्ये अनेक औषधी गुणधर्म (Medicinal properties) आहे. ते अनेक आजारांपासून आपल्याला दूर ठेवते.लसणाचा वापर लोक भाजीमध्ये करतात. लसणाचे पाणी पिल्याने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. लसुण सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ति वाढण्यास मदत होते. तसेच लसुण मध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-फंगल, अँटी-व्हायरलसह, असे गुणधर्म आढळून येतात. नियमितपणे लसणाचे सेवन केल्याने शरीराला होणाऱ्या संसर्गापासून बचाव होतो.

हे हि वाचा ; ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

हिवाळ्यात सकाळी रिकाम्या पोटी लसुण सेवन केल्याने कॉलेस्ट्रॉल कमी होते आणि आपले हृदय देखील निरोगी राहते.लसूण शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून इन्सुलिनचे प्रमाण वाढवते. मधुमेहाच्या रुग्णांनी रोजच्या आहारात लसूण खावे.

आजकाल प्रत्येकालाच वजन कमी कसे करावे ही समस्या उद्भवत असते. आजकालच्या जीवनशैली, व्यायामाचा त्रास, कामाचा ताण, चुकीच्या पद्धतीने आहार सेवन करणे, यांचा परिणाम वजनावर होतो. एकदा वजन वाढले की ते नियंत्रणात आणणे कठीण होऊन जाते. जर तुम्ही लसूण भाजून सेवन केला तर तुमचे नक्की वजन नियंत्रणात राहील. लसूण शरीरातील फॅट्सचे प्रमाण कमी करते, आणि शरीराला पोषक घटक देण्यास मदत करते. वजन जर नियंत्रणात असेल तर आजाराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.नियमितपणे लसूण सेवन केल्याने मधुमेहामुळे होणारे आजार आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत करते.

Leave A Reply

Your email address will not be published.