भडगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव –तालुक्यातील कजगाव येथे एका अल्पवीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली असून याबाबत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस स्टेशनला तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिसांतील माहिती अशी की, दि.4 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजे सुमारास कजगाव येथील बस स्थानक परिसरात लक्ष्मी भेलपुरी सेंटर येथे फिर्यादीची अल्पवइन मुलगी उभी असताना यातील संशाईत आरोपी 1)भूषण नामदेव पाटील 2) जीवन प्रभाकर चव्हाण 3) चेतन रवींद्र पाटील सर्व रा. कजगाव ता. भडगाव यांनी अल्पवइन मुलीचा हात धरून जवळ ओढत अंगलट करत तू मला खूप आवडते बाहेर ये तसेच तसेच मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
तिघही संशयित विरूद्ध भडगाव पोलिस स्टेशनला मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गु.र. न. 5/2023 भा.द. वी. कलम 354,354 (अ),34, लैंगिक अप्रधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम 2012 कलम 8 ,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.