Saturday, January 28, 2023

अवनी दत्तक योजना शैक्षणिक उपक्रमाला प्रतिसाद

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ – राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ तर्फे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान भुसावळ येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ वी जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे वर्ष ८ वे आयोजन करण्यात आले होते अभिवादन स्वरूपात दरवर्षी प्रमाणे शैक्षणिक साहित्य संकलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे रिबिन कट करून उद्घाटन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक गजानन पडघन सर, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड सर, पोलीस निरीक्षक विलास शेंडे सर, ॲड. सुनिल पगारे सर, डि.एस.हायस्कुलचे मुख्याध्यापक मोहनदास सपकाळे सर, भुसावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेसी, ॲड. प्रिया अडकमोल मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून द्विप प्रज्युलित करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे फाउंडेशन च्या वतिने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते व दरम्यान अभिवादन स्वरुपात शैक्षणिक साहित्य संकलन करण्यात येत असुन कार्यक्रमात पुढीलप्रमाणे अनेकांनी मदतीचा हात दिला PI. राहुल गायकवाड सर, PI. गजानन पडघन सर,PI.विलास शेंडे सर, ॲड.सुनिल पगारे, ॲड.प्रिया अडकमोल, पोलीस हवलदार आशा तडवी, महिला पोलीस नाईक स्मिता अहिरे, सिद्धार्थ ग्रृप भुसावळ ,डॉ.संजय नेहते, डॉ.निलिमा नेहते,प्रा.डाॅ.सुनील नेवे, विनीता नेवे, डॉ.दिपक पाटील, महिला समुपदेशन केंद्र भुसावळ भारती म्हस्के-रंधे,भिम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हा प्रमुख गणेश सपकाळे,संदिप सपकाळे, राहुल बि-हाडे,कलीम खान,विजय सोनवणे,अल्केश मोरे, विशाल वाघमारे शेख शकील किशोर जोगदंड,सुरज टिंटोरे, महिला मुक्ती मोर्चा चे संगिता भामरे,वंदना सोनवणे,सोनु वाघमारे,आतिष वारभवन, श्वेतांग चंदेल,संध्या चंदेल,न्यु.पंजाब खालसा हाॅटेल चे छोटु सारंग, नगरसेवक पिंटु कोठारी, निरंजना तायडे, प्रकाश सोनवणे, CBN न्युज 18 डिजिटल चे पत्रकार मझर शेख, अजर शेख, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष महा.राज्य रूग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना चे मयुर अंजाळेकर,सेंट्रल बँक मॅनेजर नितीन शेंडे, मयुर सुरवाडे,बाळुभाऊ सोनवणे, शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा,भुसावळ चे राहुल तायडे , पत्रकार उज्ज्वला बागुल आदींनी सकाळी ११ वा. ते संध्याकाळी ६ वा. पर्यंत दिवसभरात फाउंडेशन ला अभिवादन स्वरूपात शैक्षणिक साहित्य देऊन मदतीचा हात दिला.
उपक्रमा अंतर्गत जमा झालेले साहित्य:- २० शाळेची बॅग,२० कंपार भरलेली,२०० पेज रजिस्टर -१००, १००पेज रजिस्टर ६३, पेन १२५, लेटरपॅड ६०,पेन्सील २४,रबर १०,ड्राईंग कलर बाॅक्स छोटे 10, शिवाजी कोण होता? पुस्तक- २५ , हातरूमाल १०७ पाकिट प्रत्येक एका पाकिटात १२ हातरूमाल.इ.साहित्य दिवसभरात संकलन झाले. संकलन झालेले साहित्य होतकरू गरजवंत विद्यार्थीनींना फाउंडेशन संचालित अवनी दत्तक योजना या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत विद्यार्थीनींना वितरण करण्यात येणार असल्याचे फाउंडेशन च्या अध्यक्ष राजेश्री सुरवाडे यांनी सांगून शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी या शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी मोलाचा हातभार दिला या करिता फाउंडेशन सर्वानचे आभारी आहे अशीच साथ आम्हाला अधिक सेवाभावी कार्य करण्यास बळ देते. फाउंडेशन अध्यक्ष राजेश्री सुरवाडे यांनी सर्वाचे  आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशन सचिव निर्मला सुरवाडे, सहसचिव शैला तायडे, सुजाता सपकाळे,आशा पठारे,दुर्गा सोनवणे,लाॅ विद्यार्थी प्रतिमा अग्रवाल यांनी अधिक परिश्रम घेतले.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे