काय सांगताय? हार्दिक पंड्या पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

हार्दिक पंड्या हा आज पुन्हा लग्नाच्या बेडीत थाटामाटात त्याची पत्नी नताशा सोबत लग्न करणार आहे. टीम इंडियाचा कॅप्टन हार्दिक पंड्या (Hardik Pandya) लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाइन्स डे आहे. जगभरात व्हॅलेंटाइन्स डे प्रेमभावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच हार्दिकने लग्नासाठी आजचा दिवस निवडलाय. हार्दिकने लग्नासाठी राजस्थानची निवड केलीय. तिथे हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. हार्दिक मॉडेल नताशा स्टॅंकोव्हिकसोबत (Natasha Stankovic) विवाहबद्ध होणार आहे. जवळचे कुटुंबिय आणि मित्र परिवाराला या लग्नाच निमंत्रण देण्यात आलय. लग्नाच्या निमित्ताने हार्दिकला सरप्राइज देण्याचा प्लान कृणाल पंड्याने केलाय. हार्दिकने मॉडेल नताशा स्टॅंकोव्हिकसोबत विवाह केल्याचं 2020 मध्ये जाहीर केलं होंत. लग्नानंतर काही महिन्यातच नताशाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. हा मुलगा आता अडीच वर्षांचा आहे.

दोघांनी पहिलं लग्न कुठे केलं?

हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅंकोव्हिक मे 2020 मध्ये विवाहबद्ध झाले होते. “त्यांनी कोर्टात लग्न केलं होतं. दोघांनी कधी लग्न केलं? हे कोणालाच कळलं नाही. सर्वांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. शानदार शाही विवाह करण्याचा प्लान दोघांच्या डोक्यात होता. ते आपल्या लग्नाबद्दल खूपच उत्सुक आहेत” असं जवळच्या सूत्रांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं. कोरोना काळात हार्दिक-नताशाच लग्न झालं होतं. हार्दिक-नताशा आज दुसरं लग्न करणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.