भीषण अपघात, पाच महिला ठार; १३ जखमी

0

राजगुरुनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाटा इथं भीषण अपघात घडला आहे. पायी रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने 17 महिलांना जोरात धडक दिली . या अपघातात ५ महिलांचा मृत्यू झाला आहे. तर १३ महिला जखमी झाल्या आहेत. यात चार ते पाच महिला वाहनाच्या धडकेत रस्त्यावर पडून अक्षरशः चिरडल्या. त्यातील दोन जागीच ठार झाल्या. तीन रुग्णालयात उपचार सुरु असताना मयत झाल्या. तर १३ जण जखमी झाल्या.

सुनंदा सटवा गजेशी, सुशिला वामन देढे (रा.रामटेकडी शांतीनगर ), इंदुबाई कोंडीबा कांबळे (रा.किरकटवाडी सिंहगडरोड पुणे ), सायराबाई प्रभु वाघमारे (रामटेकडी हडपसर पुणे ), या महिला अपघातात मुत्यूमूखी पडल्या. शोभा राहुल गायकवाड, सारीका देवकर, वैषाली लक्ष्मण धोत्रे, शोभा सुभाष शिंदे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
मंगल कार्यालयात वाढपी काम करण्यासाठी या महिला स्वारगेट येथून पीएमटी बसने शिरोली येथे उतरल्या होत्या. खरपुडी येथील कृष्णपिंगाक्ष मंगल कार्यालयात असलेल्या लग्न कार्यक्रमात स्वयंपाक करून वाढपी काम करण्यासाठी जात असताना पुणेकडुन महींद्रा एक्सयुव्ही किंवा टियुव्ही या माँडेलची कार भरधाव वेगात येऊन या महिलांना जोरदार धडक दिली.

पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनवर रात्री ११वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात जखमी झालेल्या महिलांनी आरडाओरडा केला. तसेच यामध्ये काहींचा मृत्यू झाल्यामुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. दरम्यान, चांडोली ग्रामीण रुग्णालयासह राजगुरूनगर परिसरातील खासगी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले. अपघातानंतर वाहन चालकाने रस्ता दुभाजक तोडून वाहनासह तेथून पळ काढला. या घटनेबाबत खेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली असून पुढील तपास सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.