मुक्ताईनगरात १ कोटींचा गुटखा पकडला !

0

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर तालुक्याला लागून मध्यप्रदेशची सीमा असून आज अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाने जवळपास एक कोटींचा गुटख्याच्या पोत्यांनी भरलेला ट्रक पकडला असून या मोठ्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली.

काही दिवसापूर्वीच मुक्ताईनगरात अन्न व औषध प्रशासनाने २५ लाख रूपयांचा चोरीचा गुटखा जप्त केला होता. आज मुक्ताईनगर शहरात गुटख्याने भरलेला ट्रक पकडण्यात आला आहे. या ट्रकमध्ये पूर्णपणे गुटखा भरलेला होता,त्याचे बाजारभाव तब्बल एक कोटी रूपये असल्याची माहिती आ.एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. हा ट्रक मुक्ताईनगर पोलीस स्थानकात जमा करण्यात आला.

गेल्या एक महिन्यातच दीड कोटी रूपयांचा गुटखा पकडण्यात आला असून मुक्ताईनगर तालुका गुटखा आणि गांजा तस्करीचे मोठे केंद्र बनले असल्याचा आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला. आज अन्न व औषध प्रशासनाने गुटख्याचा मोठा साठा जप्त केल्यानंतर त्यांनी प्रशासनावर जोरदार टिका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here