“द कपिल शर्मा” शो मध्ये येणार पंतप्रधान मोदी…?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

कपिल शर्मा शो आणि सर्वच कलाकार मंडळी आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कसलीच कमी सोडत नाही, हे आपण सर्वच जाणून आहोत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) ची प्रमोशनसाठी नेहमीच निवड करतात. कपिलने त्याच्या स्वतःच्या कार्यक्रमातून स्वतःची एक वेगळीच ओळख प्रस्थापित केली आहे. विनोदाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या कपिलचा ‘द कपिल शर्मा शो’ लोकप्रिय आहे. कपिलच्या शो मध्ये अशी एखादी व्यक्ती असेल कि ती गेली नसेल. बॉलीवूड, टॉलीवूड, आणि हॉलिवूड मधले सुद्धा कलाकार शो मध्ये येउन गेल्याचे आपण सर्वांनीच पहिले आहे.

आता सर्वात मोती बातमी ह्या शो बद्दल अशी येत आहे कि लवकरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आपल्याला “द कपिल शर्मा” शो मध्ये दिसणार आहे. या शो मध्ये आता पर्यंत सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती, पण आता या शो मध्ये भारतातील उच्च पदस्थ व्यक्ती हजेरी लावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये हजेरी लावण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.