पाचोऱ्यात गुरांच्या हल्ल्यात माजी मुख्याध्यापकाचा दुर्दैवी मृत्यू…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

पाचोऱ्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये मोकाट गुरांच्या हल्ल्यात ८५ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा शहरातील भडगांव रोडवर वास्तव्यास असणाऱ्या अॅड. महेश बाळू पवार यांच्या वडिलांवर पाण्याच्या टाकी मागे घरासमोरील खुल्या जागेवर सकाळी ११ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे शतपावली करत असतांना ८५ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळू विठ्ठल पवार यांचेवर मोकाट तीन गाईनीं अचानक हल्ला चढवीला, घरातील मंडळींनी आराडा-ओरड करताच परिसरातील नागरिक धावत आले अन वृद्ध बाळू पवार यांची या गाईंपासून सुटका केली. मात्र मोकाट रानटी गाईंच्या शिंगानी बाबा गंभीर जखमी झाले होते. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काही तासातच उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, अजून अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी पाचोरा नगरपालिका प्रशासनाने अशा मोकाट सोडलेल्या गाईंना ठाणबंद करून त्यांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच रहीवास भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त देखील करावा अशी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.