गुणी जनों को देख हृदयमें मेरे प्रेम उमड आवे…

0

 

प्रवचन सारांश – 28/09/2022

 

गुणीजनांना पाहिल्यावर आपल्या हृदयात प्रेमाचे भाव जागृत व्हायला हवेत याबाबतचा संदेश ‘मेरी भावना’ रचनेत देण्यात आलेला आहे याबद्दल आजच्या प्रवचनात सविस्तर विश्लेषण करण्यात आले.

आपल्या मनातील भाव शुद्ध असावे असे उदाहरण सांगताना बंदुकीच्या गोळीचे उदाहरण त्यांनी दिले. ती गोळी बंदुकशिवाय समोरच्यावर गोळी फेकून मारली तर समोरच्याला काहीही इजा होणार नाही. तीच गोळी बंदुकीच्या सहाय्याने समोरच्या व्यक्तीपर्यंत गेली तर  त्या व्यक्तीला मृत्यू येईल. बंदूक माध्यम मिळाल्याने  गोळीचा प्रभाव वाढला. ‘परिमाण’ ‘आणि ‘परिणाम’ या दोन शब्दांचा उत्तम असा अर्थ आजच्या प्रवचनात समजावून सांगण्यात आला. डॉ. पदमचंद्र महाराज यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर मुनी यांनी ‘मेरी भावना प्रवचन श्रृंखलेत आजचे प्रवचन केले.

जळगाव येथील स्वाध्याय भवनात जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य श्री पू. पार्श्वचंद्र‌जी म.सा., डॉ. पदमचंद्र मुनी आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुमास सुरू आहे. आत्म्याला कशाय रूपी आजार लागला आहे. श्रावक-श्राविकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, त्यांच्यातल्या ‘भाव’ शुद्धीचा विचार ‘मेरी भावना’ या रचनेत करण्यात आलेला आहे. मित्र भाव असले तर करुणा भाव आपोआप जागृत असतो. प्रमोद भाव- प्रेम, आनंद, खुशी असे भाव गुणी लोकांना पाहून यायला हवेत. त्यासाठी रचनेत गुणी जनों को देख हृदय में मेरे प्रेम उमड आवे… जिथे प्रेम असेल तिथे क्रोध, इर्षा वा त्या व्यक्तीला प्रती दुर्भावना कधीच मनात निर्माण होत नाही.

आजच्या काळात प्रेमाचा अर्थ विकृत झालेला दिसतो. तुमच्या मनात धन्यभाव यावे. गुणी जनांमध्ये माता-पिता, गुरु अथवा आपल्याहून गुणी, श्रेष्ठ व्यक्ती यांचा समावेश असतो. गुणीजनांना बघून द्वेष भाव मनात येऊ नयेत याबाबत चिंतन करायला हवे. उत्तराध्यायन सुत्रातील हरिकेशी मुनी यांचे उदाहरण त्यांनी प्रवचनात सांगितले. राजकुमारी भद्रा हिने तिरस्कार भावनेतून ऋषिंवर थुंकले. हे यक्षाला आवडले नाही त्यामुळे यक्षाने तिच्या शरीरात प्रवेश केला. त्यामुळे राजकुमारी विचित्र वागू लागली. राजकुमारी ने हरिकेशी मुनींचा अवमान केला आधी मुनी यांची क्षमा याचना करा असे  यक्षाकडून सांगण्यात आले. राजाने साधुना  भेटून त्यांची क्षमा मागितली. राजाला रुखरुख लागली की ऋषिंनी आपल्याला माफ केलेले दिसत नाही. राजा ऋषिंना म्हणाले की,  माझ्या मुलीला विवाह आपल्या सोबत करून देईल. खरे तर साधु संतांना संसारी गोष्टींमध्ये काहीही स्वारस्य नसते. ते ऋषि नको म्हणतात परंतु भद्रा हिला मोठ्या मनाने माफ करतात.

मी दुसऱ्यासाठी नव्हे  तर स्वतः साठी, आपल्यासाठी सेवा करत आहे अशी भावना दुसऱ्यांची सेवा करताना ठेवायला हवी. सेवा कर्तव्य भावनेतून करावी. सेवाला ‘भार’ नव्हे ‘उपहार’ समजायला हवे. सेवा करण्याचे फळ नक्की मिळेल. आपल्यात शुभभाव याव्या व आनंदी आनंद जीवनात निर्माण व्हावा अशी शुभकामना  प्रवचनात दिल्या.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची मेरी भावनाही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर

 

Leave A Reply

Your email address will not be published.