बँक कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा… दिड लाखाचे सोने ग्राहकाला केले परत…

0

 

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क 

चुंचाळे येथिल साहेबराव रामदास पाटील हे सकाळी येथे बँकेत गोल्ड लोन साठी गेले असता, गर्दीमुळे व आपल्या वयामुळे जवळील सोनं राहूल ठाकूर रा. जळगाव यांच्या टेबलावर विसरून घरी निघून आले. ही बाब दोन तासानंतर कर्मचारी राहूल ठाकूर यांच्या लक्षात येताच त्यांनी कोणत्याही प्रकारे विलंब न करता त्यांना स्वताहून फोन करून माहिती दिली. आणि सदरील सोन्याचे दागिने सिल करून आपल्या कपाटात ठेवले. आपले सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचे माहीती मिळताच साहेबराव रामदास पाटील यांनी गोल्ड लोन कर्मचारी राहूल ठाकूर यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि आभार मानले.

शाखाधिकारी सतीश पाटील, बँक कर्मचारी अनिल बानाईत, चुंचाळे पोलीस पाटील गणेश पाटील, माजी जि.प.सदस्य वसंतराव महाजन, शारदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कार्याध्यक्ष सुभाष महाजन, यावल खरेदी विक्री संघाचे संचालक सुनिल नेवे, चुंचाळे माजी ग्रा.प.सदस्य दिपक पाटील, डॉ. सुनिल पाटील साकळी, विलास पाटील, चंद्रकांत नेवे, शिरसाड ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, योगेश साहेबराव पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.