राज्यांना मिळणार 16982 कोटींची जीएसटी भरपाई…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

नवी दिल्ली येथे आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर (GST) संबंधीच्या जीएसटी परिषदेची 49 वी बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर, कर रचनेबाबत आणि सवलतीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत जीएसटी अपीलीय न्यायाधिकरण, गुटखा आणि पान मसाल्यावर जीएसटी लावण्याविषयी निर्णय घेण्यात आला. तसेच  गेल्या पाच वर्षांपासूनची थकबाकी राज्यांना देण्यात येणार असल्याचीही घोषणा करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत घेतली. यामध्ये त्यांनी राज्यांना ५ वर्षांसाठी देणे असलेली संपूर्ण जीएसटी भरपाई किंवा जीएसटी भरपाईची रक्कम जारी केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. या अंतर्गत १६९८२ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

दरम्यान, या परिषदेत काकवी, पेन्सिल शार्पनरवरील जीएसटी कमी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पेन्सिल शार्पनरवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात येत असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी (Nirmla Sitharaman) दिली. त्यामुळे सर्वसामान्यांना पेन्सिल शार्पनर खरेदी करणे स्वस्त होणार आहे.  तर काकवीवरील जीएसटी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गुऱ्हाळ मालक आणि उत्पादकांना त्याचा फायदा होईल.

जीएसटी (GST) कौन्सिलच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला असल्याचे निर्मला सितारामन यांनी यावेळी सांगितले. दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह अनेक राज्यांच्या जीएसटी भरपाईबाबतही माहिती देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.