सोने -चांदीचे दर स्थिर ; जाणून घ्या आजचे दर ..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या लग्नसराईचा सीजन सुरु असल्याने सोने चांदीच्या दागिन्यांना मागणी वाढली असल्याने सोन्या चांदीच्या दरात शुक्रवारपर्यंत वाढ दिसून आली होती. मात्र आज शनिवार २१ रोजी सोन्याचांदीचे भाव जळगावच्या सराफ बाजारात स्थिर असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

२० जानेवारी रोजी सोन्याचा प्रति १० ग्राम ५६ हजार ८३० रुपये इतका भाव असल्याने आज २१ शनिवार रोजी सुवर्णनगरीत सोन्याच्या भावत कोणतीही चढ उतार दुपारी १२ वाजेपर्यंत पाहायला न मिळाल्याने सोन्याचे दर प्रति १० ग्रामला ५६ हाजरी ८३० रुपये होते. तर चांदीचे दर २० रोजी किलोमागे ६८ हजार ६३० रुपये होते . तेच दर आज २१ रोजी जळगावच्या सराफ बाजारात कायम असल्याचे दिसून आले. चांदीला दुपारी १२ वाजेपर्यंत किलोमागे ६८ हजार ६३० रुपये इतका भाव मिळाला.

Leave A Reply

Your email address will not be published.