एमपीएससीच्या मेगा भरती बाबत महत्वाचा निर्णय !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, एमपीएससीने शुक्रवारी मेगा भरती बाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यात ८ हजार १६९ जागांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठीची संयुक्त परीक्षा ३० एप्रिलला राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर होणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा होत आहे.
यातील महाराष्ट्र (Maharashtra) अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही २ सप्टेंबर रोजी, तर गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. उमेदवारांना एमपीएससीच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची मुदत २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी आहे.

पदे, वेतनश्रेणी आणि भरतीची पदे पुढीलप्रमाणे:-

सहायक कक्ष अधिकारी ३८,६००- १,२२,८०० १५
राज्य कर निरीक्षक ३८,६००- १,२२,८०० १५९
पोलिस उपनिरीक्षक ३८,६००- १,२२,८०० ३७४
दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक ३८,६००- १,२२,८०० ४९
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ३२,०००- १,०१,६०० ६
तांत्रिक सहायक २९,२००- ९२,३०० १
कर सहायक २५,५००- ८१,१०० ४६८
लिपिक-टंकलेखक १९,९००- ६३,२०० ७०३४

Leave A Reply

Your email address will not be published.