खडसे नॉटरीचेबल : तर्क वितर्कांना उधाण

0

लोकशाही संपादकीय लेख

माजी मंत्री तथा जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) हे गेल्या आठ-दहा दिवसापासून नॉट रिचेबल असल्याने जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील (Maharashtra) चर्चेचा विषय बनले आहे. त्यांच्या नोटरीचेबल असल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नाथाभाऊ समाधानी नाहीत, भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना जो मान मिळाला पाहिजे तो मिळत नाही, असा एक तर्क केला जात असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) तर्फे राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर आमदारांच्या यादीत नाथाभाऊंचे नाव देण्यात आले होते. राज्यपालांच्या यादीचा घोळ असल्याने त्यानंतर विधान परिषदेवर आमदारांकडून त्यांना निवडून पाठवून आमदार केले. राहिला मंत्रीपदाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकार कोसळले नसते, तर एकनाथराव खडसे मंत्री सुद्धा झाले असते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना मानाचे स्थान दिले जात नाही, या तारकाला अर्थ उरत नाही. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मधील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी धूसपुस आहे, असाही एक तर्क केला जातोय. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांना हव्या असलेल्या कार्यकर्त्यांची चेअरमनपदी निवड झाली नाही, म्हणून ते नाराज आहेत असेही बोलले जात आहे. शेवटी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याविषयी जुन्या निष्ठावान राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये थोडी बहुत धुसफूस असणे सहाजिक आहे. याचा अर्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे नाथाभाऊंना मानाचे स्थान आहे. नाथाभाऊंच्या शब्दाला या नेतेमंडळींजवळ किंमत आहे. त्यामुळे नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत या तरकालाही काही अर्थ उरत नाही.

एकनाथराव खडसे यांच्या आजारपणामुळे त्रस्त आहेत. त्यांचे व्याही रोहिणी खडसे यांचे सासरे डॉ. मनीष खेवलकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला सुद्धा ते उपस्थित राहू शकले नाहीत. मुंबईला रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने ते अंत्ययात्रेला येऊ शकले नाही. नाथाभाऊंच्या नातेवाईकाकडून हे सर्व सांगितले असतानासुद्धा नॉटरिचेबल विषयी तर्क वितर्कच्या चर्चांना उधाण येत आहे. आणि हे सर्व राजकारणामध्ये होतेय, हे विशेष होय. एकनाथराव खडसेंनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपमध्ये त्यांचे त्यांच्याविरुद्ध ईडीचा ससेमिरा लावला. भोसरी एमआयडीसी प्रकरणी तत्कालीन महसूल मंत्रीपदाच्या कालावधीत मंत्री पदाचा दुरुपयोग केला म्हणून भाजपमध्ये त्यांच्या प्रतीस्पर्धींनी त्यांना मंत्रिपदावरून दूर केले. त्यानंतर त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) आणि जावई गिरीश चौधरी यांच्या पाठीशी ईडी लावली. मंदाकिनी खडसे यांना ईडीच्या आरोपातून दिलासा मिळाला असला, तरी जावई गिरीश चौधरी हे मात्र गेल्या वीस महिन्यांपासून ईडीच्या कठडीत जेलमध्ये आहेत. त्यामुळे एकनाथराव खडसेंना भाजपवाले त्रास देत आहेत आणि भाजपकडून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याच्या कंड्या फिरवल्या जात आहेत, असा आरोप होत आहे. आणि त्यात तथ्यंश असल्याचा वास येतोय. तसेच एकनाथ खडसे पुन्हा भाजप मध्ये परतणार का? अशीही कंडी सोडून भाजप शिवाय आता पर्याय नाही, हे त्यांना दर्शवायचे आहे. त्यामुळे एकनाथ खडसे नॉटरीचेबल झाल्याचे तर्क वितर्क भाजपचा डाव असल्याच्या आरोपात तथ्य आहे याविषयी संशय बळावतो.

राजकारण अनेक पक्षातील नेत्यांना अपडाऊनशी सामना करावा लागतो. तसाच प्रकार नाथाभाऊंच्या जीवनाविषयी म्हणता येईल. एकनाथराव खडसे यांच्या विषयी कोणी काहीही आरोप करीत असले, तरी त्यांची त्यांच्या मतदारसंघात पकड मजबूत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप वाल्यांनी त्यांचा ठरवून गेम केला. म्हणून ऍड रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचा थोड्याशा मतांनी काठावर पराभव झाला. तो जरी पराभव असला तरी भाजप सह सर्व पक्ष एकत्र येऊन त्यांच्या विरुद्ध उभे टाकले असतानाही काठावरचा पराभव झाला असला, तरी मुक्ताईनगर बोदवड तालुक्यातील सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी आहे. दूध संघ निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात बाहेरच्या उमेदवाराकडून मंदाताई यांचा पराभव केला. त्याची कारणे वेगळी आहेत. दूध संघात खडसेंना शह दिला गेला म्हणून टिमकी वाजवणारे मात्र थोड्याच दिवसांनी झालेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायतीत मात्र शेखी मिळवली. पण त्या सर्व ग्रामपंचायततील विरोधकांच्याही चारी मुंड्या चीत झाले. त्यामुळे एकनाथराव खडसे यांचे नेतृत्व संपले, असे आरोप करणारे मात्र उघडे पडले आहेत. त्यामुळे एकनाथराव खडसेंच्या नॉटरीचेबल घेऊन त्यांच्याविषयी तर कविता हे मनाचे मांडे रचले जात आहेत, एवढे मात्र निश्चित. परंतु खडसे आजारी असताना रुग्णालयात उपचार घेत असताना अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण करण्यात येत असले तरी ते खडसेंच्याच पथ्यावर पडणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.