ऐन लग्नसराईत सोने चांदी महागले, पहा आजचे भाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुळशी विवाहानंतर लगीनसराईला सुरुवात होते. याच पाश्वभूमीवर सोने चांदीचे दर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आठवडाभरात चांदी १७०० रुपयांनी वाढली तर सोने देखील ८०० ते ९०० रुपयांनी महागले.

जळगाव येथील सराफा व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार,  २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ५७,२००  रुपये तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ६२,४०० रुपये आहे. चांदीचा दर तब्बल ७६००० रुपये प्रति किलो आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली. आज  सोने ०.१३ टक्क्यांनी म्हणजेच ७९ रुपयांच्या वाढीसह ६१,६१९ रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​ट्रेंड करत आहे. तर चांदी ०.२० टक्क्यांनी म्हणजेच १४८ रुपयांच्या घसरणीसह ७४,६५८ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.