धक्कादायक; पत्नीसह मुलाचा खून करून शिक्षकाने संपवला जीवन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्हा परिषद शाळेत मुलांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या एका शिक्षकाने आपल्या पत्नीचा गळा चिरून खून केला. त्यानंतर पोटच्या ५ वर्षीय देखील हत्या केली. इतक्यावरच न थांबता या शिक्षकाने शिक्षकाने स्वतःला देखील संपवलं. अंगाचा थरकाप उडवणारी हि घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील वर्षी तालुक्यात घडली.

अतुल मुंढे असं मृत शिक्षकाचं नाव असून तृप्ती मुंढे आणि ओम मुंढे अशी हत्या झालेल्या माय-लेकांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

अतुल यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं ? याचे गूढ अद्यापही समोर आले नाही आहे. मात्र, एकाच कुटुंबातील तिघांचा जीव गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थवरून मिळालेल्या माहितीनुसार, अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद येथे शिक्षक होते. व त्यांची पत्नी तृप्ती या बार्शीमधील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. दोघांना ५ वर्षांचा ओम नावाचा मुलगा देखील होता. सगळं काही सुरळीत सुरु असतांना मंगळवारी दुपारच्या सुमारास अतुल मुंढे यांनी पत्नीची चाकूने गाला चिरून हत्या केली.

त्यानंतर त्यांनी मुलगा ओम याचा देखील उशीने तोंड दाबून खून केला. या संपूर्ण घटनेनंतर अतुल यांनी देखील स्वत: गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, शिक्षक दाम्पत्याच्या मृत्यूची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. मृतांच्या घरासमोर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.