सोने- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सलग तीन दिवस सोन्याचा दर घसरत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे. त्याच वेळी, चांदीच्या किंमतीत 0.42 टक्के घट झाली आहे.

पुन्हा वाढू शकतात सोन्याचे भाव

देशात आणि जगभरात महागाई वाढत आहे. याशिवाय युक्रेन आणि रशियामधील वाढत्या वादामुळे जागतिक तणाव वाढला आहे. यामुळे सोन्याला आधार मिळेल आणि तो यंदा 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.

सोन्या-चांदीचा भाव

एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.07 टक्क्यांनी घसरून 49,582 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी, आजच्या ट्रेडिंगमध्ये 0.42 टक्क्यांच्या घसरणीसह चांदी 63,031 रुपये प्रति किलो पातळीवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,760 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,900 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 59,970 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,760 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,900 रुपये

अशी तपास सोन्याची शुद्धता
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 45,800 रुपये
पुणे – 45,760 रुपये
नागपूर – 45,760 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,500 रुपये
पुणे – 49,900 रुपये
नागपूर – 49,900रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.