गुडन्यूज.. धनत्रयोदशीपूर्वीच सोने चांदीच्या दरात मोठी घसरण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोने (Gold) चांदीच्या (Silver) दरात गेल्या काही दिवसापासून वाढ सुरूच होती. त्यामुळे दिवाळी (Diwali) आणि धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi) मुहूर्तावर सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे चित्र आहे.

आज शुक्रवारी २१ ऑक्टोबर रोजी भारतीय वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात मंदी आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचा भाव ०.२२ टक्क्यांनी घसरला आहे. तर एमसीएक्सवर आज चांदीचा दर ०.४७ टक्क्यांनी घसरला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आज किमती ०.०८ टक्क्यांनी घसरून १,६२६.२५ डॉलर प्रति औंस झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात वाढ झाली असून, चांदीची किंमत १.११ टक्क्यांनी वाढून आज १८.६२ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.

एक दिवस आधी गुरुवारीही भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर ५०,५१६ रुपयांपर्यंत होते. एक किलो चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली असून चांदी ५६,४५१ रुपये प्रति किलो दर आहे. गुरुवारी सोन्याचे दर ६६ रुपयांनी घसरून ५०,५१६ रुपये प्रति १० ग्रॅम झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.