सोने – चांदीच्या दरात घसरण, पहा आजचे नवे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जागतिक बाजारपेठेत सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम शुक्रवारी सकाळी भारतीय बाजारावरही दिसून आला. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली.

आज सकाळी MCX वर, 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 454 रुपयांनी घसरून 50,348 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. यानंतर मागणी कमी झाल्यामुळे सोन्यामध्ये 0.89 टक्क्यांनी घसरण झाली आहे. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही नरमाई दिसून येत आहे. MCX वर, चांदीचा भाव सकाळी 126 रुपयांनी घसरून 54,909 रुपये प्रति किलो झाला. चांदी 0.23 टक्क्यांनी घसरली आहे.

आज जागतिक बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहे. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस 1,708.51 डॉलर प्रति औंस होती. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट प्राईस 18.31 डॉलर प्रति औंस आहे.

जळगाव

सोने    :   51,800 रुपये

चांदी  :  57,200 रुपये

पुणे 

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,530 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,760 रुपये

मुंबई 

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,730 रुपये

नागपूर 

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,530 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,760 रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.