जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
हिंदू व मराठी नववर्षाला चैत्र महिन्यापासून सुरुवात होते. आज गुढीपाडव्याच्या सण असल्याने अनेक लोक सोने चांदी खरेदी करतात. आज सोने चांदी खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता दिसून आली. यामुळे ग्राहक संभ्रमात होते.
गुढी पाडव्याच्या सणाला सोने खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त असतो. जळगाव शहर हे सुवर्णनगरी म्हणून प्रख्यात आहे. आज या सुवर्णनगरीत सोने खरेदी करण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी दिसून आली.
जळगावातील सोने आणि चांदीचा दर
सोने : 52200 रुपये
चांदी : 68000 रुपये