सोन्याच्या दरात मोठा बदल; पहा आजचा भाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मागील काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात मोठा चढ उतार पाहायला मिळाला. त्यातच लग्नसराईचा हंगाम सुरू आहे.  सोन्याचे दर वाढले तरी लग्नसराईच्या हंगामात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होत आहे. यामुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दारात चढ-उतार पाहायला मिळत आहे.

जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सोने खरेदीची सध्या एक उत्तम संधी आहे. तुम्ही या संधीचा फायदा घेत स्वस्त सोने खरेदी करू शकता.  कारण येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू होऊ शकते. असा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.  आज बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरात वाढ दिसून आली आहे.

 

24 ते 14 कॅरेट सोन्याचे नवीन दर

आज बाजारात 999 शुद्ध (24 कॅरेट) सोन्याचा भाव 62396 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला. 995 शुद्धतेच्या (23 कॅरेट) सोन्याचा भाव 62146 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला आहे. 916 शुद्धतेच्या (22 कॅरेट) सोन्याचा दर 57,155 रुपये प्रति तोळा या दराने विकला जात आहे. यासोबतच 750 शुद्धता (18 कॅरेट) प्रति तोळा  46,797 रुपये दराने विकली जात आहे. याशिवाय 555 शुद्धता (14 कॅरेट) सोन्याची किंमत 36,454 रुपये प्रति तोळा या दराने विकली जात आहे. याशिवाय आज चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. 999 शुद्धतेची चांदी 73,993 रुपये प्रति तोळा दराने विकली जात आहे.

जळगाव शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचा सोन्याचा दर 62,500 रुपये असून 110 रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झालीय. तसेच आजचा चांदीचा दर 75,000 रुपये असून 130 रुपयांनी वाढ झालीय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.