जळगाव :- देशभरात जळगावची सुवर्ण बाजारपेठ प्रसिद्ध असून येथेही सोने चांदीच्या दागिन्यांना देश विदेशात मोठी पसंती मिळत असते . शुक्रवारी सोने प्रति दहा ग्रामला ६८ हजार ३० रुपये इतक्या दरापर्यंत पोह्चल्याचे चित्र पाहायला मिळाले . तर चांदीही प्रतिकिलो ७५ हजार १३० रुपये दर पाहायला मिळाले.
मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच दर ६५ हजारापर्यंत होते. मात्र ७ मार्च ला हे दर पुन्हा ६५ हजार ८०० पर्यंत जावून उच्चांकी दरावर पोहचले होते. मात्र तीन आठवड्याच्या अंतरात सोने दराने पुन्हा मोठी उसळी घेऊन प्रति १० ग्रामला ६८ हजार ३० इतका उच्चांकी दर मिळाला. आठवडाभरात सोन्याने अडीच हजारांच्या वर मजल मारली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे लग्नसराईचा मौसम असल्याने सोने चांदीच्या दागिन्यांना मागणी वाढली आहे.