सोन्या चांदीच्या दरात घसरण ; दिवाळीत दागिने खरेदीला संधी

0

जळगाव ;- सुवर्णनगरीत सध्या सोने आणि चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळत असून नवरात्र आणि पितृ पंधरवड्यात वधारलेले सोने आणि चांदीचे दर घसरत असल्याने नागरिकांना एन दिवाळीत दागिने खरेदीला सुवर्णसंधी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

५ नोव्हेम्बरपासून सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत असून सोने प्रति १० ग्राम ला आज ९ रोजी ६० हजार ३० रुपये इतका दर आज दुपारी १२ वाजेपर्यंत होता. तर चांदी प्रति किलो ७० हजार ५४० रुपये इतका दर मिळाले असून सोने प्रति १० ग्रामला ८० रुपये कालच्या तुलनेत कमी मिळाला .

तर चांदीच्या भावात कालच्या तुलनेत आज दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल ५४० रुपयांची घट पाहायला मिळाली . त्यामुळे सोने आणि चांदीचे भाव घसरल्याने सोने चांदी खरेदीला ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी होत असून दिवाळीनिमित्त दागिने, शिक्के,मूर्ती व सोने चिप आदी खरेदीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.