भारतात तस्करीमधून दोन हजार किलो सोने जप्त

0

मुंबई ;- सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच भारतात  सोन्याची तस्करी वाढली असून चोरीचे तब्बल दोन हजार किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर 2023) देशात सोन्याची तस्करी वाढली आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, या वर्षी 2000 किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच काळात पकडण्यात आलेल्या तस्करीच्या सोन्याच्या तुलनेत हे प्रमाण 43 टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी एप्रिल-सप्टेंबरमध्ये 1 हजार 400 किलो सोने जप्त करण्यात आले होते, तर संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सरकारने सुमारे 3 हजार 800 किलो सोने जप्त केले होते. भारतात  सोन्याची तस्करी प्रामुख्याने म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेशच्या सीमेवरून होते, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.