पितृ पक्षात सोने चांदीचे दर घसरले

0

जळगाव :सध्या पितृ पक्ष सुरु असल्याने सोने चांदी खरेदीला नागरिक पसंती देत नसल्याने यंदा र गेल्या आठवडेभरात सोन्याच्या दरात 1350 रुपयांची घसरण झाली असून हे दर काही दिवसांनी आणखी कमी होण्याची शक्यता आहे मात्र नवरात्रोत्सवात सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्याचे संकेत तज्ज्ञ देत आहे.

गत आठवड्यात सोन्याच्या दरात 1350 रुपयांची घसरण झाली तर सप्टेंबरचा विचार केला तर शनिवारी (महिना अखेर) 1500 रुपयांची घसरण नोंदवली गेली. यात अनेकदा दरवाढ झाली आणि सोने 59900 पर्यंत पोहोचले पण 60 हजारांचा टप्पा गाठला नाही.

सोन्याचे प्रती तोळ्याचे दर गेल्या रविवार, 24 सप्टेंबरला 59 हजार 550 होते. ते मंगळवारी 59 हजार 400 हजारांपर्यंत वाढले परंतु पुन्हा घसरण होत शनिवारी 58 हजार 200 पर्यंत खाली आले. त्यामुळे आठवडाभरात 1350 रुपयांची घसरण झाली. 1 सप्टेंबर रोजी 59 हजार 700 रुपये प्रति तोळा असलेल्या सोन्यात वाढ होऊन 4 तारखेला महिन्याभरातील सर्वाधिक 59 हजार 900 वर दर पोहचले. महिन्याच्या अखेरच्या दिवशी शनिवारी 58200 वर स्थिरावले.

Leave A Reply

Your email address will not be published.