सोन्याच्या दरात उसळी ! चांदीही वधारली ; जाणून घ्या आजचे दर ..

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या लग्न सराईचे दिवस सुरु असून आज जळगावच्या सुवर्णबाजारात सोन्याच्या दराने चांगलीच उसळी घेतली असून प्रति १० ग्राम मागे सोन्याच्या दरात ७१० रुपयांची वाढ झाली आहे.

तर चांदीच्याही दरात किलोमागे १ हजार ३० रुपयांची वाढ झाली आहे. मागील आठवड्यात सोने प्रति १० ग्राम ५६ हजार २४० होते . यात ७१० रुपयांची भाव वाढ होऊन सोने ५६ हजार ९५० इतके झाले. तर चांदी हि प्रतिकिलो ६२ हजार ८३० होते . ते आज ६३ हजार ८६० इतके दुपारी ४ वाजेपर्यंत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.