गोदावरी अभियांत्रिकीमध्ये एक्सपर्ट टॉकद्वारे मार्गदर्शन

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये संगणक विभागामार्फत आयक्यूएसी व आयआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन पद्धतीने एक्सपर्ट टॉकचे आयोजन १० मार्च रोजी करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून मयूर पाटील (नूटॅनिक्स, पुणे ) हे होते. त्यांच्यासमवेत प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता) प्रा. निलेश वाणी (संगणक प्रमुख), प्रा. तुषार कोळी (आय. क्यू. ए.सी.), प्रा. अतुल बर्‍हाटे (आय. आय. सी.) सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील व सदस्या डॉ.केतकी पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात. प्रास्ताविक प्रा. निलेश वाणी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जयश्री पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा.प्रशांत शिंपी यांच्यासह विभागामधील प्राध्यापक वर्ग यांनी मदत केली.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मयूर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला.सर्वप्रथम त्यांनी पॉवर ऑफ लिंकइंडिया बद्दल बोलताना लिंकेडिन व इंटर्नशिप किंवा जॉब कसे शोधायचे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले. त्यानंतर नोकरीसाठी आपण स्वतःला कसे तयार करावे, याबद्दल सांगताना रिझ्युमे, कम्युनिकेशन तसेच इंटरव्यूह याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर त्यांनी उद्योजकता यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.