जळगाव येथून 550 भाविक चेटीचंड जत्रेसाठी रवाना…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आज दिनांक 17.3.2023 रोजी जळगाव येथून 550 भाविक मथुरा वृंदावन, हरिद्वार, गोवा, कर्नाटक, सचखंड, मथुरा, वृंदावन, गोदडीवाला धाम येथे प्रयाण करतील.

गेली 40 वर्षे वार्षिक जत्रा भरते यंदाही ही जत्रा 21.3.23 ते 23.3.23 या कालावधीत भरणार आहे. चेटीचंड सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

अमर शहीद संत कंवर राम ट्रस्ट जळगाव संचलित हरिद्वार गोदडीवाला धाम येथे ट्रस्टतर्फे हरिद्वार समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीचे सदस्य हेमू भवनानी अध्यक्ष, रमेश मतानी, राजकुमार प्रथयथानी, जगदीश कुकरेजा, भगत बलानी, रामदास कुकरेजा, शंकरलाल लखवानी आणि अमर शहीद संत कंवर राम ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद विसरानी, ​​सचिव रमेश मतानी, अशोक मंधाण, सुरेश वरयानी, विजय दारा, कन्हैयालाल कुकरेजा, सतीश मतानी, शेखर मोतीरामानी आदी सेवेकरी परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.