गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी फिनिक्स 2K24 उत्साहात

0

जळगाव ;– विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व आपल्या कलागुणांच्या बळावर मनाच्या आत दडलेल्या प्रतिमेला एक नवे वळण मिळावे व आपल्या सुप्त गुणांना चालना मिळावी या उदात्त हेतूने महाविद्यालयांमध्ये फिनिक्स
2K24 (टेक्निकल इव्हेंट) चे आयोजन विद्यार्थ्यांसाठी दिनांक 22 फेब्रुवारी 2024 या दिवशी करण्यात आले होते.

फिनिक्स 2K24 हा एक विद्यार्थ्यांसाठीचा टेक्निकल इव्हेंट असून त्यात विविध प्रकारच्या इव्हेंट्स चा समावेश केलेला आहे. त्यात पोस्टेरॉलिक कॉम्पिटिशन, कॅड मॅडनेस, शार्क टॅंक, क्विझ स्टार, टेक्नो फ्रेंजी, सर्किट ब्लास्ट, एरर सॉल्विंग अशा प्रकारचे इव्हेंट्स होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. वर्षा पाटील ( सचिव गोदावरी फाउंडेशन) हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून डॉ. सुहास गाजरे (प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव), श्री उमेश सेठीया (CEO, सेंट्रॉनिक्स) उपस्थित होते. तसेच उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे (समन्वयक, तंत्रनिकेतन) प्रा.हेमंत इंगळे (अधिष्ठाता), फिनिक्स कार्यक्रमाचे समन्वयक
प्रा. अमित म्हसकर, सर्व विभाग प्रमुख हे व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या मान्यवरांची शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले त्यात त्यांनी फिनिक्स या कार्यक्रमात सादर करण्यात येणाऱ्या सर्व इव्हेंट ची माहिती दिली. तसेच स्पॉट एन्ट्रीद्वारे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
तसेच त्यांच्या मार्गदर्शनात फिनिक्स कार्यक्रमाबद्दल माहिती देताना महाविद्यालयामध्ये वीस वर्षापासून हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे हे नमूद केले. अशा प्रकारच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळते व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यानंतर कार्यक्रमाचे विशेष पाहुणे डॉ. सुहास गाजरे यांनी विद्यार्थ्यांना विशिष्ट चाकोरी मध्ये न राहता किंवा फक्त पुस्तकी ज्ञान न बाळगता अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन प्रकारचे ज्ञान घ्यावे, जेणेकरून या ज्ञानाचा उपयोग बाहेरील जगात त्यांना करता येईल.

त्यांनी स्टार्टअप संबंधात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मॅजिक सीड फंड कमिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी पाच लाख ते पन्नास लाखापर्यंत विद्यार्थ्यांना सहाय्य केले जाते याबद्दल माहिती दिली.
आपल्या संकल्पना किंवा आयडियाज यांना कोणत्याही प्रकारची बाउंड्रीज नसते त्यांना विस्तृत किंवा व्यापक आयाम देण्याची गरज आहे.

डिजिटल इनक्यूबेटर स्क्वेअर बद्दल माहिती सांगताना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केले की आपल्या संकल्पनांना स्टार्टअप चे स्वरूप द्या.
अगदी विशिष्ट पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी काही प्रेरक वक्तव्य केले.

त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री उमेश सेठिया यांनी विद्यार्थ्यांना त्यांची ध्येय निश्चित करण्यासाठी मार्गदर्शन केले व चिकाटीने कोणतीही गोष्ट साध्य होते हे नमूद केले.

ज्या वेळेस विद्यार्थी योग्य पद्धतीने करिअरची वाटचाल करतो तेव्हा त्याला काम करण्याचे समाधान होते.

महाविद्यालयातील वेळ हा खरा गोल्डन असतो. या वेळेचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी करायला हवा. प्रत्येक वेळेस इनोव्हेटिव्ह सोल्युशन वर काम करणे गरजेचे आहे.

कोणतेही काम टीम किंवा सांघिक पद्धतीने केल्यानंतर सोपे होते. अशा पद्धतीमुळे तुमच्या विकासाची घोडदौड ही सुरूच राहील. अशा विविध गुणवैशिष्ट्यांवर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

त्यानंतर डॉ. वर्षा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या दैनंदिन गरजा ओळखून त्याप्रमाणे नियमावली करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला वेळेचे महत्व कळेल व वेळ वाया जाणार नाही नवनवीन संकल्पना जागतिक स्तरावर आपले महत्त्व सिद्ध करीत आहेत. त्या संकल्पनांचा अभ्यास विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. बाहेरील जगाला ज्या कलागुणांचे अपेक्षा विद्यार्थ्यांकडून असते ते कला गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे असते ते अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असते. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

फिनिक्स 2024 या कार्यक्रमांमध्ये 500 च्या वर प्रतिस्पर्धींनी सहभाग नोंदविला.

या टेक्निकल इव्हेंट मध्ये जळगाव जिल्हा तसेच जवळील परिसरातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या इव्हेंट मध्ये सहभाग नोंदविला होता.

बक्षीस वितरण समारंभ

बक्षीस समारंभाला श्री योगेश हेबळकर (DGM HR हिताची ॲस्टोमो), श्री धनंजय जेहुरकर (DGM HR सुप्रीम) यांची उपस्थिती होती.

मान्यवरांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

श्री योगेश हेबळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यानी नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी तत्पर असायला हवे. तसेच त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती प्रबळ प्रमाणात असावी त्याचप्रमाणे कोणत्याही इव्हेंट मध्ये सहभाग नोंदविणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपन्यांना विद्यार्थ्यांकडून कोणत्या प्रकारच्या कौशल्याची अपेक्षा असते याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.

त्यानंतर श्री धनंजय जेहुरकर यांनी त्यांचा लर्निंग एक्सपिरीयन्स सांगितला. त्यामध्ये त्यांनी आपला एटीट्यूड कसा असायला हवा याबद्दल सांगितले. आपली तुलना इतरांशी न करता स्वतःशी करणं शिकायला हवं.

त्याचप्रमाणे त्यांनी अरुणिमा सिन्हा ची प्रेरक गोष्ट सांगताना असे नमूद केले की प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपण यश आत्मसात करू शकतो.

स्वतःची ताकद ओळखून त्या पद्धतीने मार्गक्रमण करायला हवे. जीवनातील प्रत्येक क्षण जगायला हवा. आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नक्की नोंदवायला पाहिजे.

त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर श्री आयुष प्रसाद यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे फोनवरूनच संदेश देऊन विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला बद्दल शुभेच्छा आणि विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयामार्फत प्रथम पारितोषिक 3000 रुपये, द्वितीय पारितोषिक 2000 रुपये व तृतीय पारितोषिक 1000 रुपये असे बक्षीस तसेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे बक्षीस देण्यात आले.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर व सदस्य डॉ. केतकी पाटील मॅडम यांनी आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळजा महाजन, खुशबू पाटील, कोणीका पाटील व हेमाक्षी राणी, निलाक्षी बर्डे, श्वेता बोरसे, हेमांगी बावा, वजीहा सय्यद व भाग्यश्री पाटील या विद्यार्थिनींनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अमित म्हसकर तसेच सर्व कमिटी मध्ये असलेले शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
फिनिक्स 2K24 पारितोषिक विजेते विद्यार्थी

पोस्टेरॉलिक कॉम्पिटिशन
डिप्लोमा
1 प्रांजल पाटील ,सार्थकी चौधरी
2 वैष्णवी पंढारे
3 राधा जाधव ,साक्षी चिकटे
डिग्री
1 आस्था वाळे ,सानिका पाटील
2 मानसी भगत
3 सोहेल कच्छी, सुमेध बेंडाळे

कॅड मॅडनेस
डिप्लोमा
1 हर्षल खेडकर
2 कल्पेश बडगुजर
3 भावेश चौधरी
डिग्री
1 काजल विश्वकर्मा
2. सौरभ धांडे
3 कामिनी राजपूत

शार्क टॅंक
डिप्लोमा
1 खगेश नारखेडे, महेश नारखेडे
2 मुकेश ताठे, रितेश सोनार
3 ग्रीष्मा पाटील
डिग्री
1 वैष्णव चौधरी
2 जय खडसे, प्रवीण पाटील, अदिती पवार
3 सोहेल कच्छी

टेक्नो फ्रेन्जी
डिप्लोमा
1 केतकी टिकले
2 सिमरन कोळी
3 सुयोग राऊते
डिग्री
1 चेतन शिंदे
2 साक्षी करांडे
3 युगल रडे

क्विझ स्टार
डिप्लोमा
1 वंश येवले
2 मृगेश पाटील
3 सोहम वाणी
डिग्री
1 सुहास सोलंके
2 कोणीका पाटील
3 कुणाल बागुल

सर्किट ब्लास्ट
डिप्लोमा
1 महेंद्र पाटील, सारंग पाटील
2 यश बोंडे, अनिरुद्ध राऊत
3 महेश नारखेडे, पायल सूर्यवंशी

एरर सॉल्विंग
डिप्लोमा
1 कलश किनगे
2 प्रांजल कापुरे
3 वेदिका पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.