जामनेर शहरातुन दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील पाचोरा रोड वरील श्रीकृष्ण नगरातील पती, सासु, जेठ तसेच जेठाणी यांच्यासह वास्तव्यास असणारी दोन लहान मुले असलेली विवाहित महिला अचानक कुणालाही न सांगता बेपत्ता झाल्याने परीसरात एकच खळबळ उडाली असुन, विवाहित महिला बेपत्ता असल्याची नोंद जामनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, श्रीकृष्ण नगर भागातील रहिवासी दिपक प्रभाकर मराठे व पत्नी कोमल दिपक मराठे वय (२६) तसेच मोठा मुलगा कार्तिक दिपक मराठे (वय ७) व रोहन दिपक मराठे वय (२ वर्षे ६ महिने) यांच्यासह वास्तव्यास आहेत. दिनांक १८ रोजी सुमारे सकाळी ८ ते १ वाजेच्या दरम्यान कुणालाही काही एक न सांगता, राहत्या घरातून कोठेतरी आपल्या दोन मुलांसह निघुन गेली. सर्वत्र शोधाशोध केली असता, विवाहित व मुले दिसुन आले नाहीत. अखेर विवाहितेच्या पतीने जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉं. रामदास कुंभार हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.