गिरणाजल फाउंडेशन तर्फे योगा प्राणायाम शिबिर संपन्न

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

पिलखोड ता. चाळीसगाव गिरणाजल फाउंडेशन मार्फत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अंबिका योग कुटीर ठाणे मार्फत यांच्या विद्यमाने ऑनलाइन योग प्राणायाम शिबिर संपन्न झाले. या शिबिरासाठी रामचंद्र सुर्वे, एस.आर कुलकर्णी, सुधीर सावंत, सूर्यकांत कालुस्टे मिलिंद नारखेडे व त्यांची टीम यांनी विशेष मार्गदर्शन करून प्राणायामाची माहिती दिली. या योगासन अभ्यासकांनी प्राणायाम विशेष माहिती प्रदान केली प्राणायाम केल्यामुळे आपले शरीर आपले जीवन, सुखी समृद्धीचे होते, असे आव्हान केले.

Leave A Reply

Your email address will not be published.