मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
तालुक्यातील ग्राम देवधाबा येथून एक 20 वर्षीय तरुणी घरातून निघून गेल्याची घटना घडली आहे. ब्लाउज घेऊन येते सानागत घरातून बाहेर पडली होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, देवधाबा येथील सरला गणेश सनानसे (20) ही मलकापुर येथील इंगळे लेडीज टेलर यांचेकडे ब्लाऊज आणण्यासाठी जात असल्याचे सांगून दि.9 एप्रिल 24 रोजी सकाळी दहा वाजता घरुन निघाली होती, मात्र सायंकाळ पर्यंत घरी परत आली नाही. दरम्यान याबाबत गणेश उत्तम सनानसे यांनी मलकापुर ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली.
मुलीचे वर्णन – पांढऱ्या रंगाचा टॉप, पांढ-या रंगाची लेगीस, काळी पांढरी ओढणी, रंग- गोरा, उंची 5 फुट, बांधा – सडपातळ, नाकावर कपाळा वरती गोधलेले. पायात पिंक कलरचा शुज, याबाबत पुढील तपास पो.हे.कॉ रविकांत बावसकर हे करीत आहे.