गौतमीच्या ‘घुंगरू’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आपल्या लावणी आणि सौंदर्याने सगळ्यांना भुरळ घालणारी  गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. तिने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावले असून आता गौतमीचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले असून चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर गौतमीच्या या चित्रपटाचे पोस्टर व्हायरल झाले आहे.

 

काही दिवसांपूर्वी गौतमीच्या ‘घुंगरू’  या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून नृत्यांगणा गौतमी अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. मात्र, राजकीय घडामोडींमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळी चित्रपटाचे निर्माते बाबा गायकवाड यांनी “काही कारणाने ‘घुंगरू’ या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील आठ दिवसांत ‘घुंगरू’ सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येईल” असे म्हटले होते. काही दिवसांपूर्वी ‘घुंगरू’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या ट्रेलरमध्ये गौतमीच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. त्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.