महाराष्ट्र दिनानिमित्त “गर्जा महाराष्ट्र माझा” तून शूरवीरांना शाहिरी मानवंदना…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

दि. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबईतर्फे आयोजित “गर्जा महाराष्ट्र माझा”, हा शाहिरी व सांस्कृतिक कार्यक्रम जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात सायंकाळी सात ते दहा या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन जळगाव शहर मनपा चे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी महापौर सीमा भोळे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, सांस्कृतिक कार्य विभागाचे सुर्यकांत ढगे, मकरंद मसराम, शाहीर शिवाजीराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रभाकर कला संगीत अकादमीच्या कलावंतानी गणरायाचे वंदन गीटावर नृत्य सादर करून केली, यानंतर शाहीर शिवाजीराव पाटील यांनी आपल्या अंदाजात

भारत मातेच्या शूरवीरांनो,  तुम्हालाच पहिला

घ्या मानाचा मुजरा, आमचा शाहिरी मुजरा..!

हे स्फूर्ती गीत गाऊन रसिकांमध्ये चैतन्य निर्माण केले व हुतात्म्यांना या गीतातून मानवंदना अर्पण करण्यात आली. यानंतर शिवाजीराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या पोवाड्यातून महाराष्ट्र दर्शन घडविले नाट्यरंग थिएटरच्या धनश्री जोशी यांनी भारुडाच्या माध्यमातून रसिकांमध्ये एक विशेष रंगत निर्माण केली. कोळंबा येथील रघुनाथ बाविस्कर आणि सहकारी कलावंतांनी आपल्या शाहिरी गर्जनेद्वारे छत्रपतींना मानवंदना अर्पण केली. शाहीर विनोद ढगे व सहकारी यांनी महाराष्ट्राचा मराठी बाणा,  शाहिरी डफ हा कडाडला, “छत्रपती शिवराय तुम्ही घ्या,  मानाचा मुजरा”… हे स्फूर्तीदायक शिवगीत गाऊन रसिकांमध्ये चैतन्य निर्माण केले. तसेच युवा शाहीर सुरज राऊळ यांच्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी, या कार्यक्रमाच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आपल्या भाषणातून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित कार्यक्रमाचे कौतुक करताना आपल्या पारंपरिक लोककला लोप पावत चालल्या असताना अशा उपक्रमाच्या माध्यमातून लोककलाना उत्तेजन मिळेल असे मत व्यक्त केले.

दरम्यान माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते लोककलावंताचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन महाजन यांनी केले. खानदेशातील अनेक नामांकित कला संस्था व रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येन या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य विभागाचे सुदर्शन ढगे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाहीर विनोद ढगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यसस्वी ते साठी चेतन सरोदे, दुर्गेश अंबेकर, अरविंद पाटील, अमोल ठाकुर, अवधुत दलाल यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.