गणेशोत्सवासाठी ३२ विशेष रेल्वे गाड्या धावणार

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सन २०२२ च्या गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ३२ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालविणार आहे. या विशेष गाड्या आधीच घोषित केलेल्या ७४ गणपती विशेष गाड्यांव्यतिरिक्त आहेत.  या अतिरिक्त ३२ गणपती विशेष ट्रेन्सच्या वेळा, थांबे आणि संरचनेत कोणताही बदल झालेला नाही, ज्यांचे तपशील खाली दिले आहेत.

 १.  मुंबई- सावंतवाडी दैनिक विशेष (१६ सेवा)

01137 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि. १३.८.२०२२ ते २०.८.२०२२ (८ सेवा) दररोज ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

01138 विशेष सावंतवाडी रोड  येथून दि. १३.८.२०२२ ते २०.८.२०२२ (८ सेवा) दररोज १४.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता  पोहोचेल.

२.  नागपूर – मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (६ सेवा)

01139 विशेष नागपूर येथून दि. १३.८.२०२२, १७.८.२०२२ आणि २०.८.२०२२ (३ सेवा) रोजी १५.०५ वाजता सुटेल आणि  मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता  पोहोचेल.

01140 विशेष मडगाव येथून  दि. १४.८.२०२२, १८.८.२०२२ आणि २१.८.२०२२ (३ सेवा) रोजी रोजी १९.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

 ३.  पुणे – कुडाळ विशेष (2 सेवा)

01141 विशेष गाडी दि. १६.८.२०२२ रोजी पुणे येथून ००.३० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता  पोहोचेल.

01142 विशेष दि. १६.८.२०२२ रोजी कुडाळ येथून १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०६.५० वाजता पोहोचेल.

 ४.  पुणे-थिविम/कुडाळ-पुणे विशेष (४ सेवा)

01145 विशेष पुणे येथून दि. १२.८.२०२२ आणि १९.८.२०२२ रोजी १७.३० वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता  पोहोचेल.

01146 विशेष कुडाळ येथून  दि. १४.८.२०२२ आणि २१.८.२०२२ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे  दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.

 ५.  पनवेल – कुडाळ/थिवि – पनवेल विशेष (४ सेवा)

01143 विशेष पनवेल येथून दि. १४.८.२०२२ आणि २१.८.२०२२ रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि त्याच कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता  पोहोचेल.

01144 विशेष थिवि येथून दि. १३.८.२०२२ आणि २०.८.२०२२ रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे  दुसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता  पोहोचेल.

आरक्षण: सर्व गणपती विशेषचे विशेष शुल्कासह  बुकिंग ८.७.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविडचे योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.