गणपती बाप्पाला जल्लोषात भावपूर्ण निरोप …

0

 

जळगावात मिरवणूक; ढोल ताशांच्या गजरावर तरुणाई थिरकली , उज्जैन व केरळच्या पथकाने वेधले लक्ष

जळगाव ;-  गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… अशी आर्त साध घालत गणेश भक्तांनी बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. जळगाव महापालिकेचा मानाचा गणपतीची मिरवणुक सकाळी १० वाजता सुरु झाली. त्यांच्यापाठोपाठ ७२ गणेश मंडळाच्या मूर्ती रांगेत सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे यंदा केरळ व उज्जैन येथील पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. या पथकांनी जळगावकरांचे लक्षवेधून घेतले होते.

जळगावात गणोशोत्सव मोठ्या भक्तीभावाने उत्साहात साजरा केला जातो. दहा दिवस पूजा अर्चा करून गणरायाला वाजत गाजत निरोप देण्यात येतो. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता महापालिकेचा मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर एका मागे एक गणेश मंडळाच्या पथकांची रांग लागली होती. गुरुवारी सकाळी १० वाजेपासून तर शुक्रवारी पहाटे ५.४५ मिनिटापर्यंत मिरवणूक सुरु होती. १८ तास ४५ मिनिटांनी मिरवणूक आटोपली. सर्वांत शेवटी बळराम पेठ येथील आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. तोपर्यंत जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलीस अधीक्षकांसह सर्व अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी जिल्हा पोलिस दलाने चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, मेहरूण तलाव येथे २०२ मोठ्या बाप्पांचे तर १५ हजाराच्यावर लहान मूर्तीचे विसर्जन झाल्याची माहिती पोलीस दलाकडून देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ढोल वाजवून धरला ठेका
जळगाव-आज अनंत चतुर्दशी निमित्त सर्वत्र गणपती बाप्पांच्या भाविकांमध्ये उत्साह दिसून येत असून आज महापालिकेसमोर मानाच्या मनपा गणपतीच्या ढोल ताशा पथकात सहभागी होऊन स्वतः हातात ढोल घेऊन वाजवण्याचा आनंद जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली दिसून आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा उत्साह प्रचंड दिसून येत होता.

 

मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी ढोल ताशांच्या गजरात केले नृत्य

मानाच्या महापालिकेच्या गणपती आरती नंतर जळगाव शहराच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला . यावेळी मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी ढोल ताशांच्या तालावर नृत्य करून लक्ष वेधून घेतले . त्यांच्या समवेत इतर अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.अग्निशमन विभागाकडून मानवंदना देण्यात आली दुपारी एक वाजता टॉवर चौकात गणपती आल्यावर मनपाच्या अग्निशमन विभागाने मानवंदना दिली. तसेच कडाक्याचे ऊन असल्याने पाण्याचे फवारे सोडून अग्निशमन विभागाने सलामी दिली असता सर्व भाविक भक्तांसह मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांनी वरून पडणाऱ्या पाण्यात ठेका धरला होता.

मिरवणूक बघण्यासाठी भाविकांची गर्दी

मोठ्या उत्साहात सुरु असलेल्या गणरायाची मिरवणूक बघण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला होता. यावर्षी सर्व मंडळांकडून मोठ मोठ्या गणेश मूर्ती स्थापण करण्यात आल्या.

होत्या. या मूर्ती बघण्यासाठी दूर दूर भाविक जळगावात दाखल झाले होते. तसेच दरवर्षी ढोल ताशा, बॅन्ड व डी.जे.च्या तालावर गणरायाला निरोप दिला जात होता परंतु यवर्षी केरळ व उज्जैन येथून झांझ पथक मागविण्यात आले होते..

. शिवाजी नगरातील वज्रेश्वरी देवी मंडळाने आकर्षक सजावट व रोषाणाईतील केलेल्या रथातून बाप्पाची मिरवणूक काढली. या मंडळाच्या सिंगारी मेलम पथकाने त्यांच्याकडील पारंपारीक वाद्य वाजवत जळगाकरांचे लक्ष वेधून घेतले. पारंपारीक वाद्य व वेशभूषा केलेल्या पथकाचे यावर्षी विशेष आकर्षण होते. तसेच बीज बाजूप्रभू गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी झांज खेळत बाप्पाला निरोप दिला. गणपती, छत्रपती शिवाजी महाराज, मावळयांसह वारकऱ्यांशी वेशभूषा करून व काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कुर्ता पायजमा, फेटा बांधून मिरवणुकीत सहभाग घेतल्याने मिरवणुकीची शोभा वाढली होती.

महाराणा प्रताप मंडळाची महाकालची शाही सवारी व जैनाबाद परिसरातील महर्षी वाल्मिक तरुण सांस्कृतिक मंडळाचे उज्जैन येथील महादेव भक्त, महाराजांची वेशभूषा केलेल्या पथकाने आगीचे प्रात्यक्षिक करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. महाराजांची वेशभूषा केलेल्या पथकाकडून होणारे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी मोठी उत्सुकता भाविकांमध्ये दिसून येत होती. ढोल-ताशांचा गजर, लेझीम, झांज पथकांनी व रसत्यावर टाकण्यात आलेल्या रांगोळ्यांच्या पायघड्यांनी मिरवणुकीची शोभा वाढली होती. या मिरवणुकीत मंडळांकडून गुलाला ऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षांवर करण्यात येत होता

Leave A Reply

Your email address will not be published.