संतापजनक..आईसमोरच मुलीवर सामूहिक बलात्कार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबईत पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका 14 वर्षीय गतीमंद मुलीवर धावत्या टॅक्सीत बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती. दिवसेंदिवस महिला अत्याचाराचे प्रकार घडत आहेत. त्यातच मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अवघ्या १५ वर्षांच्या मुलीवर आईसमोरच सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईच्या मुलुंड भागात ही घटना घडली आहे. सामूहिक बलात्कार झालेली पीडित तरुणी अवघ्या 15 वर्षांची आहे. आरोपींनी आईला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी या घटनेप्रकरणी एका 21 वर्षीय आरोपीला अटक केले आहे.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सामूहिक बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक परराज्यात रवाना झाले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.