हिरापुर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

पारोळा ;- पारोळा तालुक्यातील हिरापुर येथील २२ वर्षीय तरूणांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील हिरापुर येथील राहुल मानकु भिल वय २२ हा दि ९ रोजी सकाळी ९ च्या सुमारास चुलीसाठी लाकडे घेऊन येतो असे सांगून घरून निघाला. परंतु सांयकाळ पर्यंत परत न आल्याने त्याचा वडीलांनी आजुबाजुच्या परिसरात तसेच आपल्या नातेवाईकांन कडे तपास केला असता तो मिळुन न आल्याने सांयकाळी पारोळा पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दिली होती. तसेच दिं,१६ रोजी सकाळी काही लोक हिरापुर शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेले असता त्यांना निंबाच्या झाडाला राहुल हा गळफास घेतल्याचे अवस्थेत दिसून आला. राहुल यांच्या वडिलांना मानुक भुरा भिल यांनी याची माहिती दिली. त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता तो राहुल असल्याचे सांगितले. मानकु भिल यांच्या खबरी वरून पारोळा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.