गडचिरोली येथे वाघाच्या कातडीची तस्करी, २ जण ताब्यात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वाघाच्या कातडीची तस्करी करतांना गडचिरोलीच्या एटापल्ली येथे दोघांना व विभागाने अटक केली आहे. बुधवारी पहाटे ३ वाजता एटापल्ली-जीवनगट्टा मार्गावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. शामराव रमेश नरोटे (रा.वासामुंडी) आणि अमजद खान पठाण (रा.एटापल्ली) अशी आरोपींची नवे असून, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतला आहे. त्यांच्याकडून वाघाची कातडी जप्त करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र-छत्तीसगड वनविभागाला एटापल्ली तालुक्यात वाघाच्या कातडीची तस्करी संदर्भात माहिती मिळाली होती. माहिती अगदी खात्रीशीर असल्यामुळे वनविभागाचे कर्मचारी कामाला लागेल होते. २९ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजता दोन्ही राज्यांच्या विभागाने एटापल्ली- जीवनगट्टा महामार्गावर सापळा रचला होता. या दरम्यान, एका दुचाकीवरून दोन व्यक्ती संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. त्यांची कसून तपासणी केली असता, प्लॅस्टिकच्या पिशवीत वाघाचे कातडे आढळून आले. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. वनकायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

महिनाभरापूर्वी एटापल्ली तालुक्यातील मवेली परिसरात वाघाने बैलाची शिकार केली होती. त्यामुळे खळबळ माजली होती. मात्र, त्यांनतर त्याभागात वाघाची कुठलीही हालचाल दिसून आलेली नाही. त्यामुळे या वाघाची शिकार झाल्याचा संशय वन अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे वन विभागाने त्या दृष्टीने तपास सुरू केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.