‘फिर होगी प्यार की बरसात..‘उड जा काले कावा’ के साथ; सनी देओलची पोस्ट चर्चेत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘सनी देओल’ (Sunny Deol) आणि ‘अमिषा पटेल’ (Amisha Patel) ‘गदर’ चित्रपटातून हि जोडी अगदी लोकप्रिय झाली. आणि घरा-घरात जाऊन पोहोचली. आणि आता अनेक वर्षानंतर याच सिनेमाचा दुसरा भाग ‘गदर २’ पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गदर सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. आता दुसऱ्या भागाची चर्चा सुरु आहे. ज्याप्रमाणे गदर सिनेमाने चाहत्यांना वेड लावले होते. त्याचप्रमाणे चित्रपटही गाण्यांनी सुद्धा प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. ‘गदर’ सिनेमातील लोकप्रिय गाणं ‘उड जा काले कावा’ गाणं प्रदर्शित झालं आहे. अभिनेते सनी देओल यांनी गाणं इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. सध्या सर्वत्र ‘उड जा काले कावा’ गाण्याची चर्चा सुरु आहे. नुकताच गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून गाण्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे…

‘उड जा काले कावा’ गाणं सोशल मीडियावर पोस्ट करत सनी देओल यांनी कॅप्शनमध्ये, ‘फिर होगी प्यार की बरसात… ‘उड जा काले कावा’ के साथ…. एवढंच नाही तर, अभिनेत्याने अमिषा पटेल हिला देखील टॅग गेलं आहे…सध्या सर्वत्र ‘गदर २’ सिनेमातील ‘उड जा काले कावा’गाण्याची सर्वत्र चर्चा रंगत आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. टीझर देखील चाहत्यांना प्रचंड आवडला. टीझर,‘उड जा काले कावा’ गाण्यानंतर चाहते ट्रेलर आणि सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाबद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे दिसून येत आहे.

‘गदर २’ सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘गदर २’मध्ये आता तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे. सनी देओलच्या मुलाची भूमिका अभिनेता उत्कर्ष साकारणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.