Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जी. एच. रायसोनी महाविद्यालयात प्राध्यापक-पालक सभा संपन्न
    जळगाव

    जी. एच. रायसोनी महाविद्यालयात प्राध्यापक-पालक सभा संपन्न

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 4, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्रथम वर्ष बीसीए-एमसीए विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सदर सभेसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख, बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

    उपस्थित पालकांना मार्गदर्शन करतांना रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम असून तंत्रज्ञानाबाबत त्यांना बऱ्याच गोष्टी न शिकवता ते स्वतः शिकतात. हीच बाब त्यांनी अभ्यासातही केली पाहिजे. यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होईल. पालकांनीदेखील आपल्या मुलाच्या महाविध्यालयातील अभ्यासाबाबत वेळोवेळी चौकशी केली पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे तसेच त्यांनी यावेळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली.

    विद्यार्थ्यांच्या सोयी तसेच शेक्षणिक सुविधा व रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी बीसीए-एमसीए क्षेत्रातील विविध उपलब्ध संधीची माहिती दिली. तसेच प्राध्यापकांसोबत पालकांची त्यांच्या पाल्याप्रती जबाबदारीची जाणीवही करून दिली. महाविद्यालयाचे विद्यार्थी देश – विदेशातही कार्यरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालक आणि प्राध्यापकांची भूमिका महत्त्वपूर्ण असली पाहिजे असे सांगितले. यानंतर रायसोनी महाविद्यालयाचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असून स्वायत्त जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात यावर्षापासूनच मेजर व मायनर प्रोग्राम, अॅकड्मिक बँक ऑफ क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन अॅप्रोच आदीची सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० च्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु आहे. तसेच या धोरणामुळे शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन सर्वांचेच उत्तरदायीत्व वाढणार असून थोडक्यात तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधन आणि प्रयोगशिलतेद्वारे देशाला प्रगती पथावर नेण्याचे उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाद्वारे साध्य केले जाणार आहे तसेच आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी पालक सर्वोतोपरी प्रयत्न करीत असतात. पण तरीही उच्च शिक्षण घेऊन नोकरी न मिळणे, यामागचे कारण अध्यापही पालक शोधू शकले नाहीत. बहुधा आपला पाल्य महाविद्यालयात वेळेवर जात आहे किंवा नाही, जात असेल तर वर्गात बसतो की नाही या बाबत घरी विचारणा करण्यात येत नसावी. यामुळे महाविद्यालय व विद्यार्थी यांच्यातील संवाद पालकापर्यंत पोहचत नाही. शिक्षण घेण्याची स्व:ताची आत्मीयता असावी. शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये आत्मियता निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालयाकडून परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. तसेच विद्यार्थ्याने स्व:शिस्त अंगीकारावी कारण तुमच्या यशस्वीतेमागे शिस्तबद्धता सर्वात महत्वाची आहे. असा सल्ला श्री. शेखावत यांनी यावेळी दिला.

    यानंतर बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांनी प्रेझेन्टेशन सादर करत बीसीए-एमसीए विभागातील विध्यार्थ्याच्या शैक्षणिक वाढीसाठी अध्यापनाची बदललेली पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर सभेचे समन्वयक व एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख यांनी आपल्या आभार प्रदर्शनात सदर सभेच्या आयोजनाचा उद्देश व हेतू स्पष्ट केला. तसेच महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मार्गदर्शकानी पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नाचे उत्तरे देत त्यांचे समाधान केले. सदर चर्चासत्रात सर्व पालकांनी उत्स्फुर्त संवाद साधला. पालकांनी महाविद्यालयाची शिक्षणपद्धती तसेच उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करत त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे नमूद केले. पालकांनी विविध सूचना नोंदविल्या तसेच त्यांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्याचे अनुमोदनही दिले. प्रा. विनोद महाजन यांनी सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.ऐश्वर्या परदेशी, प्रा. करिश्मा चौधरी, प्रा.मनिषा राजपूत, प्रा.मानसी दुसे, प्रा हर्षिता तलरेजा, प्रा.कविता भंगाळे यांनी सहकार्य केले. सदर पालक सभेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी अभिनंदन केले.

     

    G. H. Raisoni College jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif